पिंपरी : महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकीदारांवर धडक कारवाई सुरू केली आहे.  दोन दिवसात तब्बल १२८ लाखबंद (सील) केल्या आहेत. लाखबंदची कारवाई सात जानेवारी पर्यंत केली जाणार आहे. त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कराचा भरणा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर आकारणी व कर संकलन विभागाकडून तीन लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या बिगरनिवासी, ओद्योगिक, मिश्र मालमत्ता प्राध्यान्याने जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, विभागाने शनिवार आणि रविवारी  कारवाईची धडक मोहिम राबविली. यामध्ये शनिवारी ६५ मालमत्ता  लाखबंद करण्यात आल्या असून रविवारी ६३  मालमत्तावर लाखबंदची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शनिवारी १३९ मालमत्ताधारकांनी दोन कोटी ९१ लाख १३ हजार ७७० तसेच रविवारी ८९ मालमत्ताधारकांनी एक कोटी ८० लाख २४ हजार १३ इतका एकूण तब्बल चार कोटी ७१ लाख ३७ हजार ७८३ रुपयांच्या रकमेचा मालमत्ता कराचा भरणा केला. लाखबंद कारवाईची मोहिम सात जानेवारीपर्यंत सलग राबविण्याय येणार असून एक लाखाहून अधिक थकबाकी असणारी एकही बिगरनिवासी ,औदयोगिक आणि मिश्र मालमत्ता या कारवाईमधून वगळली जाणार नाही.

हेही वाचा >>> नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा सज्ज, गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क

शहरातील जागरूक नागरिकांनी कायम जागरूकपणे कराचा भरणा करून शहराच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. महापालिकेने नागरिकांना मालमत्ता करामध्ये विविध सवलती दिल्या असून नागरिकांनी त्याचा लाभ सुद्धा घेतला आहे. आता थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा भरणा करून मालमत्ता लाखबंदची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा >>> लष्कर, डेक्कन भागात उद्या वाहतूक बदल, काही रस्त्यांवर सायंकाळी पाचनंतर वाहनांना बंदी

नागरिकांनी कर भरण्यासाठी महापालिकेकडून विविध माध्यमातून वेळोवेळी आवाहन करण्यात आले. अद्यापही ज्या नागरिकांनी कर भरला नाही अशा नागरिकांना आपली मालमत्ता लाखबंदीस पात्र असल्याची जप्ती पूर्व नोटीस सुद्धा पाठविण्यात आली.  अद्याप ज्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला नाही अशा मालमत्तावर मालमत्ता लाखबंदची कारवाईची मोहिम सुरू करण्यात आली आहे. ही मोहिम सात जानेवारीपर्यंत  चालू  राहणार आहे. एक लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या शंभर टक्के बिगरनिवासी, ओद्योगिक, मिश्र मालमत्तावर प्राधान्याने मालमत्ता  लाखबंदची कारवाई करण्यात येणार आहे. यामधून एकही मालमत्ता वगळण्यात येणार नाही.  त्यामुळे थकबाकीदारांनी आपल्या कराचा ऑनलाईन स्वरूपात भरणा करून मालमत्ता  लाखबंदची कारवाई टाळावी. कार्यवाहीच्या वेळेस पुढील दिनांकाचे  धनादेश कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे- पाटील यांनी सांगितले.

लाखबंदीनंतर पुढे काय? महापालिकेने लाखबंद केलेल्या मालमत्तेचा मालमत्ताधारकाला वापर करता येणार नाही. पूर्ण थकबाकी भरल्यानंतर महापालिकेकडून लाखबंदची कारवाई मागे घेण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporation sealed 128 properties over non payment of tax dues pune print news ggy 03 zws