पिंपरी : महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने ६८ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यापैकी ६२ जणांनी तत्काळ कर भरला. तर, सहा मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांनी मालमत्ता जप्त होऊ नये, यासाठी त्वरित कर भरणा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा सहा लाख सात हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेचा कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत ५८५ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांना एक ऑक्टोबरपासून दोन टक्के विलंब शुल्क लागू झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : अण्णा हजारे यांच्याविषयी समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस

थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी तीव्र मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर संकलन विभागाने ४१ हजार ३०७ जणांना जप्ती नोटीसा तर ३६ हजार ७१९ मालमत्ताधारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. या मालमत्ता धारकांकडे ६७१ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. नोटीसा देऊनही कर न भरणाऱ्या सुरूवातीला बिगर निवासी व मोकळ्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. तीन ऑक्टोबरपासून जप्ती माहिती सुरू करण्यात आली असून दोन हजार १८४ मालमत्ता धारकांना जप्ती अधिपत्र दिली आहेत. यापैकी एक हजार ९४८ मालमत्ता जप्ती अंमलबजावणीसाठी पात्र आहेत. यामध्ये ६८ मालमत्तांची जप्ती करण्यात आली. जप्ती करताच ६२ जणांनी तत्काळ ८७ लाख ३७ हजार रुपये रोख अथवा धनादेश जमा केले. जप्ती मोहिमेसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जप्ती मोहिमेची माहिती दिली जाणार आहे. थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत.

हेही वाचा : पुणे लोकसभा प्रियांका गांधी लढणार का? नाना पटोले म्हणाले, “हायकमांड…”

“महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या विविध सवलत योजना, माहिती यासह जनजागृती, थकबाकीदारांची माहिती व्हाॅट्सअॅप चॅनेल वरून प्रसारित करण्यात येणार आहे. जास्तीत -जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे”, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख (कर आकारणी व कर संकलन विभाग) यांनी म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporation seized 68 properties in just 4 days due to non payment of property tax pune print news ggy 03 css
Show comments