पिंपरी : चालू आर्थिक वर्ष (२०२४-२५) संपण्यास अवघे तीन महिने बाकी असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेचा करआकारणी व करसंकलन विभाग मालमत्ताधारकांना देयकांचे घरपाेच वितरण करण्यात अपयशी ठरला आहे. कर भरण्यासाठी मालमत्ताधारकांच्या भ्रमणध्वनीवर (मोबाईल) संदेशाचा (एसएमएस) मारा केला जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुसरीकडे घराेघरी देयकांचे वितरण झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिला बचत गटांच्या माध्यमातून महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून घरोघरी, दुकाने आणि आस्थापनांवर जाऊन मालमत्ता करांच्या देयकांचे वितरण करण्यात येते. त्यासाठी एका देयकामागे महापालिका २० रुपये शुल्क देत आहे. त्याकरिता महिलांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. एप्रिल आणि मे २०२४ या दोन महिन्यांत शंभर टक्के देयके वितरित झाल्याचा दावा करसंकलन विभागाने केला आहे. मात्र, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांतील नऊ महिने संपत आले तरी, अद्याप मालमत्ताधारकांना देयके मिळाली नाहीत. त्यामुळे नेमके किती देयक आहे, हे त्यांना समजले नाही. असे असताना करसंकलन विभागाकडून दररोज भ्रमणध्वनीवर संदेशाचा मारा केला जात आहे.

हेही वाचा >>>रखवालदारावर पिस्तुलातून गोळीबार;  मोटारीतून आलेल्या आरोपींकडून दगडफेक; रखवालदाराची पत्नी जखमी

मालमत्ताधारकांच्या भ्रमणध्वनीवर देयक भरा, विलंब दंड टाळा, देयक न भरल्यास जप्तीपूर्व नोटीस दिली जाईल, मालमत्ता जप्त केली जाईल, असे संदेश येत आहेत. मात्र, हातात देयक नसल्याने ते नागरिकांना भरता येत नाही. चिंचवड स्टेशन आणि पिंपळे गुरव भाग, तसेच शहरातील अनेक भागांत देयकांचे वाटप झाले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. गेली तीन वर्षे घरी देयक आले नाही. त्यामुळे किती मालमत्ताकर भरायचा आहे, हे समजले नाही. त्या संदर्भात संबंधित विभागीय कार्यालयाकडे तक्रार केली आहे. मात्र, त्याची कोणी दखल घेत नाही, असे सदनिकाधारक प्रशांत जंगम यांनी सांगितले.

देयकांचे वितरण झाले आहे. देयक आले नसेल, तर मालमत्तेचा मिळकत कर क्रमांक माहिती असल्यास महापालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर देयक उपलब्ध होते. ऑनलाइन देयक भरणे सुलभ आणि सुरक्षित आहे. देयक भरल्यानंतर संदेश येत असतील, तर त्याची तपासणी केली जाईल, असे करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.