आगामी महापालिका निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणासाठी आज (शुक्रवारी, २९ जुलै) सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. अनुसूचित जाती आणि जमातीचे यापूर्वी निश्चित केलेले आरक्षण कायम राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सकाळी ११ वाजता सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण करण्यासाठी ही सोडत काढण्यात येणार असल्याचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी कळवले आहे.

एकूण प्रभागसंख्या ४६ असणार –

नव्या रचनेनुसार पिंपरी पालिकेच्या नगरसेवकांची संख्या १३९ असणार आहे. त्यापैकी ७० महिला व ६९ पुरुष अशी वर्गवारी असणार आहे. एकूण प्रभागसंख्या ४६ असणार आहे. ओबीसींसाठी ३७ जागा राहण्याची शक्यता असून त्यातील १९ जागा महिलांसाठी राखीव असू शकतील. अनुसूचित जातींसाठी २२ जागा असून त्यापैकी ११ महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमातींसाठी तीन जागा असून त्यापैकी २ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal election obc reservation in pimpri municipality today pune print news msr