पिंपरीः आगामी पालिका निवडणुकांच्या तयारीसाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी (११ डिसेंबर) ‘विचार वेध कार्यकर्ता प्रबोधन शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन मंगल कार्लयालयात हे शिबीर होणार आहे. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने शिबिराचा समारोप होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाऊसाहेब भोईर, कविता आल्हाट, रविकांत वरपे, राहुल भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> पिंपरी नाट्य परिषदेतर्फे प्रशांत दामले यांना मानपत्र

शिबिरात महाराष्ट्राची राजकीय संस्कृती (मधुकर भावे), राजकीय पक्ष व मीडिया तंत्रज्ञान (शीतल पवार), सोशल मीडिया (सम्राट फडणीस), आरक्षण (हरी नरके), भारतीय अर्थव्यवस्थेची दुरवस्था (कुमार केतकर), भारताच्या निर्मितीत गांधी, नेहरू, आंबेडकर यांचे योगदान (संजय आवटे), सध्याची राजकीय स्थिती (अमोल मिटकरी), लोकशाही व षडयंत्र (छगन भुजबळ) यांची व्याख्याने होणार आहेत.