महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून पुढील आठवडय़ापासून प्रचाराची राळ उठणार आहे आणि उमेदवारांच्या प्रचारासाठी ‘स्टार प्रचारकां’च्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी शहरातील शंभरपेक्षा जास्त मैदानांवर झडणार आहेत. पिंपरीत सभांसाठी महापालिका शाळांची मैदाने उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याशिवाय चापेकर चौक, पिंपरी एच.ए.चे मैदान, नवमहाराष्ट्र विद्यालय यासह इतर मोक्याच्या चौकात प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महापालिकेच्या सत्तेची चावी हातात घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस आदी पक्षांनी कंबर कसली आहे, तर सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची धडपड सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ गुरुवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सायंकाळी सहा वाजता होणार आहे. इतर पक्षांच्या प्रचाराचा प्रारंभही चालू किंवा पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. शहरातील शंभरपेक्षा जास्त मैदाने सभांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. कोपरा सभा, छोटय़ा सभा तसेच प्रचाराच्या रॅली या मैदानांवर होणार आहेत. शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये प्रचार सभा घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्राधान्य असते. त्यामुळे तेथील वाहतूक सुरुळीत ठेवण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांना १९ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारावे लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ६७ शाळांची मैदाने प्रचारसभेसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्या सर्व मैदानांची यादी पोलिसांकडे देण्यात आली असून, त्यांच्या ना हरकतीनंतर सभेसाठी मैदाने देण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम पसंती यानुसार मैदाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिकांच्या शाळांशिवाय चिंचवड येथील चापेकर चौक, सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी.चे निम्मे मैदान, थेरगाव डांगे चौक, काळेवाडी येथील पाचपीर चौक, पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालयाचे मैदान, पॉवर हॉऊस चौक, आकुर्डी प्राधिकरणातील संभाजी चौक, भोसरी चौक, भोसरी येथील गावजत्रा मैदान, चिखली मुख्य चौक, साने चौक, कृष्णानगर भाजी मंडई चौक यासह इतर मैदानांमध्ये यावेळीही राजकीय पक्षांकडून मोठय़ा सभांचे आयोजन केले जाणार आहे.