पिंपरी : मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत कोणतीही करवाढ-दरवाढ नसलेला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांचा मूळ पाच हजार ८४१ कोटी ९६ लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह आठ हजार ६७६ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी जाहीर झाला. निवडणूक वर्षामुळे सलग तिस-यावर्षी करवाढ, दरवाढ टळली आहे.
मागील दोन वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी मंगळवारी प्रशासक शेखर सिंह यांना अर्थसंकल्प सादर केला. प्रशासकांनी अर्थसंकल्पाला तत्काळ मान्यता दिली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यावेळी उपस्थित होते. महापालिकेचा ४२ वा तर आयुक्त सिंह यांचा दुसरा अर्थसंकल्प आहे.
हेही वाचा…पिंपरी : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महापालिका आयुक्तांना नोटीस, काय आहे प्रकरण?
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये!
महापालिकेच्या विकास कामासाठी १८६३ कोटी तरतूद
आठ क्षेत्रीय कार्यालयासाठी १९० कोटी
स्थापत्य विशेष योजनांसाठी १०३१ कोटी ७९ लाख
शहरी गरिबांसाठी १८९८ कोटी
हेही वाचा…पिंपरी- चिंचवड पोलिसांनी पकडलं लाखोंचं मेफेड्रोन ड्रग्स; एक जण ताब्यात
महिलांच्या विविध योजनांसाठी ६१ कोटी ५८ लाख
दिव्यांग कल्याकणारी योजना ६५ कोटी २१ लाख
पाणीपुरवठा २६९ कोटी ८९ लाख
पीएमपीएमएलसाठी २६९ कोटी ८९ लाख
हेही वाचा…पुणे : नगर रस्त्यावर गर्दीच्या वेळेत जड वाहनांना बंदी
भूसंपादनकरिता १०० कोटी
स्मार्ट सिटीसाठी ५० कोटी रुपये तरतूद