पिंपरी : शहराची आगामी ४० वर्षांत होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करून चिखलीत २०० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिली. त्यामुळे केंद्राचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून २६७ एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासाठी भाजप सत्ताकाळात प्रकल्प हाती घेण्यात आले. त्याअंतर्गत चिखली येथे १०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. त्याद्वारे समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा सुरू झाला आहे. महापालिका हद्दीत १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये वाढलेली लोकसंख्या आणि पाण्याची गरज याचा विचार करता भामा आसखेड प्रकल्पांतर्गत चिखली येथे प्रस्तावित २०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्यानुसार प्रशासनाने जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रकल्पाला मान्यता दिली. या केंद्रामुळे चिखली, तळवडे, मोशी, चऱ्होली, दिघी, डुडूळगाव, जाधववाडी या गावांतील पाणी प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे.

uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका

हेही वाचा…पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० आरोपींवर ‘मोक्का’

शहरातील आगामी ४० वर्षांतील वाढत्या नागरीकरणाचा विचार करून भामा आसखेड धरणातून थेट पाईपलाइनद्वारे पाणी पिंपरी-चिंचवड शहरात आणण्यात येणार आहे. त्या अंतर्गत १०० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करून त्याचे लोकार्पण झाले आहे. आता चिखली येथे २०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राला मंजुरी मिळाली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. डिसेंबर २०२५ पर्यंत या प्रकल्पातून तळवडे, चिखली, मोशी, चऱ्होली आणि दिघी परिसरात पाणी पुरवठा सुरू होईल, असा विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.