लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह बंडखोरीचा इशारा दिलेल्या मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विनोद नढे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सोमवारी पुण्यात भेट घेतली. चिंचवडमध्ये ज्याला उमेदवारी द्याल, त्याचे काम करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. त्यामुळे भोसरीनंतर चिंचवडमधील माजी नगरसेवकही पक्षांतराच्या तयारीत आहेत. त्यामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Bunty Shelke arrived with a fogging machine due to the increase in mosquitoes nagpur news
नागपुरात डासांचा उद्रेक…अन् काँग्रेस उमेदवार प्रचार सोडून फाॅगिंग…
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
BJP leader former MP Navneet Ranas campaign vehicle get viral in Amravati
नवनीत राणा म्‍हणतात, “…त्या नेत्यांचा हिशेब करा”, प्रचार वाहनाची जोरदार चर्चा

महायुतीत ‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा’ असे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या भोसरी आणि चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यातूनच राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भोसरीतील २० माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. लोकसभेला शिरुरमधून उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज असलेले माजी आमदार विलास लांडे सातत्याने शरद पवार यांची भेट घेत आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, जागा न मिळाल्यास भाजपचे काम करणार नसल्याचा इशारा देत चार माजी नगरसेवकांनी बंडखोरीचे संकेत दिले. त्यांनी भूमिका स्पष्ट करून चार दिवस झाले. तरी, पक्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या चार माजी नगरसेवकांनी माजी आमदार लांडे यांच्यासह पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली.

आणखी वाचा-हडपसर भागात टोळक्याकडून वाहनाची तोडफोड, शहरात दहशत माजविण्याचे सत्र कायम

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती शरद पवार यांना सांगितली. आमचा विचार व्हावा. पण, तुम्ही जो उमेदवार द्याल, तो आम्हाला मान्य असेल. आमच्यासह भाजपमधील काही माजी नगरसेवक त्या उमेदवाराचा प्रचार करतील, अशी ग्वाही या माजी नगरसेवकांनी शरद पवार यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. भोसरीतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रवी लांडगे यांनीही पवार यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

भाऊसाहेब भोईर उद्या भूमिका स्पष्ट करणार

चिंचवडमधून विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असलेले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी उद्या (२ ऑक्टोबर) निर्धार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यातून ते पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. भोईर अपक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-घटस्थापनेसाठी दुपारी पावणेदोनपर्यंत मुहूर्त, तृतीयेची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे

राष्ट्रवादीत असलो तरी आता पर्याय शोधला पाहिजे. किती दिवस शांत राहणार आहे. चार दिवसांपूर्वी आम्ही भूमिका स्पष्ट केली होती. परंतु, पक्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही चार माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद नढे यांनी सांगितले.