राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये अॅक्टिव्ह झाले आहेत. १६ ऑगस्ट रोजी अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होणार आहे. ज्या मैदानावर अजित पवार यांची सभा होणार आहे. त्या मैदानाची आज पार्थ पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. पार्थ पवार यांनी फलंदाजीसोबत गोलंदाजीदेखील केली. तसेच, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीदेखील फलंदाजी केली.
हेही वाचा – सुप्रिया सुळे यांचा फोन, व्हॉट्सअॅप हॅक; स्वतःच दिली माहिती
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष देत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात पूरग्रस्तांशी संवाद साधत पार्थ पवारांनी पूरस्थितीचा आढावा घेतला होता. एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवार गटात अनेक जण जात आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला होता का? अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या सोबतीने पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये लक्ष देत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये अॅक्टिव्ह झाले आहेत. असे असलं तरी अजित गव्हाणे हे त्यांच्या काही सहकाऱ्यांसह शरद पवार गटात गेल्यानंतर अद्यापही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा शहराध्यक्ष निवडण्यात आलेला नाही.