पार्थ अजित पवार यांच्या वक्तव्याचा भाजपा विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी चांगला समाचार घेतला आहे. आपण महायुतीत आहोत आणि अशा प्रकारची वक्तव्ये करणं पार्थ पवार यांनी टाळावीत, अशी प्रखर टीका अमित गोरखे यांनी पार्थ पवार यांच्यावर केली आहे. चिंचवड विधानसभा हा भाजपाचा बालेकिल्ला असून तो आम्ही कधीच सोडू शकणार नाही, असे देखील अमित गोरखे यांनी अधोरेखित केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – पुणे : वडगावशेरी भागातील नागरिकांनी अजित पवारांसमोर वाचला समस्यांचा पाढा

हेही वाचा – पार्थ अजित पवारांचा चिंचवड विधानसभेवर दावा; म्हणाले, नाना काटे यांना….

पार्थ अजित पवार यांनी विठ्ठल उर्फ नाना काटे यांना चिंचवड विधानसभेतून आमदार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य काही वेळापूर्वीच केलं होतं. त्याचे पडसाद उमटले असून भाजप विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी पार्थ पवार यांना प्रत्युत्तर दिल आहे. अमित गोरखे म्हणाले, पार्थ पवार यांचे विधान ऐकलं आहे. त्यांना सांगू इच्छितो की, आपली महायुती आहे. महायुती टिकवायची असेल तर अशी वक्तव्ये करणं टाळलं पाहिजे. महायुतीचा धर्म पाळणं आपल्या सर्वांच काम आहे. पुढे ते म्हणाले, चिंचवडमध्ये भाजपचे मोठं काम आहे. तो भाजपचा बालेकिल्ला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ आम्ही कधीही सोडू शकणार नाही. असं सडेतोड उत्तर अमित गोरखे यांनी दिल आहे.