पिस्तुल विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथक आणि शस्त्र विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. मध्य प्रदेश येथून आणलेल्या पिस्तुलांची विक्री करण्यासाठी पिस्तुल विक्रीचे स्टेटस चक्क इन्स्टाग्रामवर ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणी खंडू कालेकर, अक्षय सुर्वे आणि शुभम खडकेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तीन पिस्तुल आणि बारा काडतुसे जप्त केली आहेत. खंडू आणि अक्षय या दोघांनी मध्य प्रदेश येथुन सहा पिस्तुल आणली होती. यापैकी तीन पिस्तुलं घेऊन तुषार उर्फ आप्पा गोगावले हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध पोलीस घेत आहेत. 

हेही वाचा >>> पुणे : तरुणीची छेड काढल्याचा आरोप करुन व्यावसायिकाला लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडू कालेकर आणि अक्षय सुर्वे या दोघांनी मध्यप्रदेश येथून सहा पिस्तुल आणली होती.पिस्तुल विक्रीसाठी संबंधित गुन्हेगार हे पिंपरी इथल्या डांगे चौकात येणार होते. खंडूने इंस्टाला पिस्तुल विक्रीच स्टेट्स ठेवलं होतं, त्यात त्याने ७० हजार रुपयांना पिस्तुल आणि काडतुसे असल्याचं नमूद केलं. पोलिसांच्या गुंडा विरोधी पथक आणि शस्त्र विरोधी पथक यांना याबाबतची कुणकुण लागताच त्यांनी सापळा रचला. मात्र त्या अगोदरच सराईत गुन्हेगार तुषार उर्फ आप्पा गोगावले हा तिथून तीन पिस्तुल आणि काडतुसे घेऊन पसार झाला. पिस्तुल विक्रीबाबत डांगे चौकातून खंडू, अक्षय आणि शुभमला अटक करण्यात आली आहे, पिस्तुल विक्री होण्याअगोदरच पोलिसांनी तीन गुन्हेगारांना जेरबंद केलं आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, अमरीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करण्यात आली आहे.

Story img Loader