पिंपरी- चिंचवड: गणपती मंडळांनी बळजबरी वर्गणी गोळा केल्यास त्या मंडळांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयुक्तालयात पार पडलेल्या मध्यवर्ती शांतता समितीच्या बैठकीत दिला आहे. या बैठकीला सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे हे उपस्थित होते.
हेही वाचा : आपलं हिंदू राष्ट्र वाढलं पाहिजे – स्वप्नील कुसाळे
पिंपरी- चिंचवड आयुक्तालयात पार पडलेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यावर चर्चा झाली. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गणेश उत्सव शांततेत पार पडावा यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तालयाच्या नियमानुसार नोंदणी करणे अपेक्षित आहे. अन्यथा त्या मंडळावर कारवाई दाखल करण्यात येईल. त्याचबरोबर गणेश मंडळांनी नोंदणी नसताना नागरिकांकडून बळजबरीने वर्गणी गोळा केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे. गणपती उत्सव म्हटलं की डी.जे चा आवाज आलाच. महिला, रुग्ण, लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांना जास्त त्रास सहन करावा लागणार नाही, याबाबत पोलिसांचं नियंत्रण यावर असणार आहे.
© The Indian Express (P) Ltd