सध्या लॉकडाउन असल्याने अनेक जण परदेशात अडकलेले आहेत. राजीव लोचन हे देखील अमेरिकेत अडकले असून आज त्यांचा मुलगा वत्सल्यचा वाढदिवस होता. मात्र, ते अमेरिकेमध्ये असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये येणं त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी थेट पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांन दोन दिवसांपूर्वी ई-मेल करून मुलाचा वाढदिवस असल्याची माहिती दिली. त्यानंतर संध्याकाळी त्यांचा मुलगा राहत असलेल्या ठिकाणी सांगवी पोलिसांनी अचानक जाऊन त्याला सुखद धक्का दिला आणि उत्साहात त्याचा वाढदिवस साजरा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवसरात्र जनतेसाठी राबणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एका १५ वर्षीय मुलाला सुखद धक्का देत त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. वत्सल्यचे वडील राजीव लोचन हे अमेरिकेत असून लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकले आहेत. राजीव यांना मुलाचा वाढदिवस साजरा करायचा होता. त्यामुळे त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना ई-मेल करून मुलाचा वाढदिवस करावा अशी विनंती केली. आयुक्तांनी याची खात्री करून सांगवी पोलिसांना याची माहिती दिली. आज संध्याकाळच्या सुमारास पोलिसांच्या गाड्यांचा ताफा उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे-सौदागर येथे पोहचला आणि मुलाला सरप्राईज देण्यात आलं. वत्सल्यला खाली बोलावून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि पोलीस कर्मचारी याच्या समक्ष वत्सल्यने केक कापून आपला १५ वा वाढदिवस साजरा केला.

यावेळी वत्सल म्हणाला, “आज दिवसभर माझा वाढदिवस असल्यासारखा वाटत नव्हतं. मात्र, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जे सरप्राईज दिलं त्यामुळे मी भारावून गेलो आहे. यासाठी त्यांचे मी आभार मानतो. दरम्यान, सर्वसामान्य व्यक्तींनी घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे पोलीस अधिकारी सबलर यांनी सांगितलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad police give 15 year old boy a surprise in lockdown celebrated birthday aau 85 kjp