लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिंपरी : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३१ डिसेंबरला रात्रीपासून ते एक जानेवारीला पहाटेपर्यंत १८१९ पोलीस असणार आहेत.

नववर्षाचे स्वागत करताना हॉटेल, ढाबा चालक-मालक यांच्याकडून नियमांचे पालन व्हावे, यासाठी पोलीस दलाने संबंधितांना सूचना दिल्या आहेत. ध्वनिप्रदूषण होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. याबरोबरच रात्री बारानंतर ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई शहरातील हॉटेल, ढाबा, क्लब, तसेच मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळी जातात. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची आणि वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे. वाहनातील प्रवाशांकडे मद्य बाळगण्याचा परवाना नसेल, तर वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. संबंधितांची ब्रेथ ॲनालायझर मशिनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. मद्यपान करून वाहन चालविल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

आणखी वाचा-पुणेकरांसाठी नवे वर्ष कोंडीमुक्त! पोलीस आयुक्तांचा संकल्प; वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ‘रडार बेस टेक्नोलॉजी’चा वापर

नववर्षानिमित्त प्रार्थना स्थळे, मॉल, हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष गस्त घालण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. भरधाव वाहन चालवणाऱ्यांवर विशेष लक्ष असणार आहे. कर्कश हॉर्न वाजविणारे, एका दुचाकीवरून तिघेजण जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

असा असणार बंदोबस्त

एक अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त, आठ सहायक पोलीस आयुक्त, ४६ पोलीस निरीक्षक, १५४ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, १५२० पोलीस अंमलदार, एक जलदगती पथक, पाच राज्य राखीव पोलीस दलाची पथके, आठ स्ट्रायकिंग दल आणि ७० वॉर्डन असा १८१९ पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असणार आहे.

आणखी वाचा-Pune Pub : पुण्यात पबने ग्राहकांना पाठवली कंडोम आणि ORS ची पाकिटे; नवीन वर्षाच्या पार्टीचे निमंत्रण वादात

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेतली आहे. नववर्ष साजरे करताना सर्वांनी वाहतूक आणि सामाजिक नियमांचे पालन करावे. नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.