पुण्यातील पोर्षे कार अपघातानंतर पिंपरी- चिंचवड पोलीस ऍक्टिव्ह झाले आहेत. शहरातील बार आणि पबमध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जातो आहे का? हे स्वतः जाऊन तपासत आहेत. यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. १० ते १५ जणांच पथक, ते ही बुलेट वरून जात थेट पब च्या गेटवर पोहचत आहे. आत प्रवेश करून खरच तिथं अल्पवयीन मुलं तर मद्यपान करत नाहीत ना याची खात्री करत आहेत.

पुण्यातील पोर्षे अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. पोलिसांच्या तपासात अल्पवयीन मुलाने मद्यपान केल्याचं आढळलं होत. तो एका पबमध्ये दारू प्यायल्याच निष्पन्न झाले आहे. याच घटनेमुळे स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरातील पोलीस आता सतर्क झाले आहेत. शहरातील गल्ली बोळ आणि मुख्य रस्त्यांवर बुलेटवरून गस्त घालत थेट पब, बार ला सरप्राईज भेट देत आहेत. पब, बार मध्ये अल्पवयीन मुलांना मद्यपान करू दिलं जात नाही ना?, याची तपासणी करत आहेत. पबमध्ये प्रौढ व्यक्तींना एक दिवसाचा मद्य सेवन करण्याचा परवाना दिला जात आहे. तिथं कायद्याच उल्लंघन तर होत नाही, ना हे देखील तपासले जात आहे. दरम्यान, पब किंवा बार मध्ये अल्पवयीन मुलगा आढळल्यास त्या पब, चालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असा थेट इशारा पोलिसांनी दिला आहे. ही संकल्पना पिंपरी- चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची आहे.

हेही वाचा >>>Pune Accident : अपघात झाल्यानंतर विशाल अगरवाल यांचे आमदार सुनील टिंगरेंना ४५ मिस्डकॉल्स, फोन रेकॉर्डवरून धक्कादायक माहिती समोर

“बार अँड रेस्टॉरंटमध्ये आम्ही भेट देत आहोत. नियमानुसार आणि कायद्यनुसार काम सुरू आहे की नाही, हे तपासले जात आहे. एक दिवसाचा मद्यपान सेवन परवाना आणि अल्पवयीन मुलगा तर नाही ना हे तपासले जात आहे. पोलिसांची गस्त वाढवली आहे. रस्त्यावरून पोलीस जात असताना वेगळा इम्पॅक्ट होतो. अल्पवयीन मुलगा दारू पिताना आढळून आला तर प्रचलित कायद्यानुसार बार मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार.”-कन्हैया थोरात- वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी

Story img Loader