पिंपरी : वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १५ गंभीर गुन्हे केलेल्या विकी मल टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने ही कारवाई केली. मागील आठ महिन्यांत ३० संघटित टोळ्यांतील २४८ गुन्हेगारांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली. टोळी प्रमुख विकी रामप्रसाद मल (वय ४२, रा. थेरगाव), प्रसाद रोहीदास भापकर (वय २४, रा. रहाटणी), प्रतीक अंतवण पवार (रा. थेरगाव) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील तीन गुंड तडीपार

आरोपींच्या विरोधात वाकड, पिंपरी पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत, दुखापत, पळवून नेणे, डांबून ठेवणे, खंडणी, वाहनांची तोडफोड, जाळपोळ करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगा करणे असे १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीमधील आरोपी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करत होते. वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad police invoke mcoca against 30 gangs 248 criminals in imprisonment pune print news ggy 03 css
Show comments