पिंपरी : पिंपरीतील पवार आणि निगडीतील जाधव टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हे आदेश दिले. सन २०२४ पासून आतापर्यंत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील १८ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ९८ आरोपींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झाली आहे.

पवार टोळीचा प्रमुख अविनाश राकेश पवार (वय २८), संतोष उत्तम चौगुले (वय ३०), ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली राजेंद्र पाटील (वय २७), रंजना उत्तम चौगुले (वय ५२), यश बाबू गरुड (वय १८), निसार मोहम्मद शेख (वय २५) आणि रेणुका मारुती पवार (वय ३६, सर्व रा.दत्तनगर, चिंचवड) यांच्यावर कारवाई करण्यात आली. या टोळीवर ११ गुन्हे केल्याची नोंद आहे.

Pimpri-Chinchwad Police, Pimpri-Chinchwad, voting,
मतदानासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस सज्ज; ४३३३ पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Pune parents, children Pune, Pune, survey,
मुलांना आहारात दूध देण्यास पुणेकर पालकांची पसंती! सर्वेक्षणात…
Prohibitory orders in counting center area of ​​Koregaon Park area
कोरेगाव पार्क भागातील मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
Pune, Allegation of distribution of money,
पुणे : भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात ‘राष्ट्रवादी’चा ठिय्या
Chandrakant Tingre, Vadgaon Sheri, Sharad Pawar group leader ,
पुण्यातील वडगावशेरीमधील शरद पवार गटाचे नेते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला
Pollution increases risk of lung disease Bad air has long-term health effects
प्रदूषणामुळे फुफ्फुसरोगाच्या धोक्यात वाढ! खराब हवेमुळे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होताहेत…
Raid on gambling den in Katraj area Crime against 16 people
कात्रज भागात जुगार अड्ड्यावर छापा; १६ जणांविरुद्ध गुन्हा
During campaign discuss and reactions of ordinary Pune residents
लोकजागर : राजकारण्यांना हे लक्षात आलेय का?
in pimpri chinchwad need facilities to collect garbage even at night
कचरा गोळा करण्यासाठी रात्रीही हवी याची सुविधा!

हेही वाचा : इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील २९ बंगल्यांवर हातोडा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणांचा पिंपरी महापालिकेला आदेश

निगडी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये जाधव टोळीचा प्रमुख जितेंद्र आनंदा जाधव (वय २३), आकाश ऊर्फ बबुल दत्ता मोरे (वय १९), अमन समीर शेख (सर्व रा. ओटा स्कीम, निगडी) आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या टोळीवर सात गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीतील आरोपींच्या विरोधात खुनी हल्ला, दरोडा, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत, दुखापत, कट रचणे, तोडफोड करणे, विनयभंग करणे, बेकायदारीत्या शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.