पिंपरी : पिंपरीतील पवार आणि निगडीतील जाधव टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हे आदेश दिले. सन २०२४ पासून आतापर्यंत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील १८ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ९८ आरोपींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पवार टोळीचा प्रमुख अविनाश राकेश पवार (वय २८), संतोष उत्तम चौगुले (वय ३०), ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली राजेंद्र पाटील (वय २७), रंजना उत्तम चौगुले (वय ५२), यश बाबू गरुड (वय १८), निसार मोहम्मद शेख (वय २५) आणि रेणुका मारुती पवार (वय ३६, सर्व रा.दत्तनगर, चिंचवड) यांच्यावर कारवाई करण्यात आली. या टोळीवर ११ गुन्हे केल्याची नोंद आहे.

हेही वाचा : इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील २९ बंगल्यांवर हातोडा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणांचा पिंपरी महापालिकेला आदेश

निगडी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये जाधव टोळीचा प्रमुख जितेंद्र आनंदा जाधव (वय २३), आकाश ऊर्फ बबुल दत्ता मोरे (वय १९), अमन समीर शेख (सर्व रा. ओटा स्कीम, निगडी) आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या टोळीवर सात गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीतील आरोपींच्या विरोधात खुनी हल्ला, दरोडा, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत, दुखापत, कट रचणे, तोडफोड करणे, विनयभंग करणे, बेकायदारीत्या शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.