पिंपरी : शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘मोक्का पॅटर्न’ राबविला आहे. मागील सात महिन्यांत २१ संघटित टोळ्यांमधील २०९ गुन्हेगारांवर ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३८ गुन्हे केलेल्या चौहान टोळीवरही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरीतील टोळी प्रमुख अमर उर्फ रिंकू कुलवंतसिंग चौहान (वय २६, रा. नेहरुनगर, पिंपरी), साहिल सुधीर धनवे (वय २०), रोहित प्रविण धवणे (वय २०, दोघे रा. महेशनगर, पिंपरी), अक्षय अण्णा रणदिवे (वय २९, रा. एमआयडीसी, भोसरी) यांना अटक करत मोक्काची कारवाई केली. तर, सोन्या रणदिवे (रा. नेहरुनगर, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो पसार आहे.

हेही वाचा – पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावरील ब्लॉक वेळेत संपला; मुंबईच्या दिशेने वाहतूक सुरू

या टोळीतील आरोपींच्या विरोधात पिंपरी, पुणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे, कट रचणे, पुरावा नष्ट करणे, अपहरण करणे, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खंडणी मागणे, दुखापत करणे, वाहनांची तोडफोड असे विविध गंभीर ३८ गुन्हे दाखल आहेत. स्वतंत्रपणे १२ गुन्ह्यांसह ३२ गुन्हे केल्याची नोंद आहे.

हेही वाचा – ‘कसब्या’चा धडा घेऊन भाजप शहराध्यक्षांची निवड

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्‍त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्‍त बाळासाहेब कोपनर, सतिश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, राज राजमाने, सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, अनिल गायकवाड, दत्ताजी कौठेकर यांच्या पथकाने केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad police mcoca pattern 209 criminals from 21 gangs nabbed pune print news ggy 03 ssb