पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मालमत्ता विरोधी पथकाने २५ कोटींच चंदन पकडल आहे. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली. अद्याप कंटेनर मध्ये किती चंदन आहे. हे स्पष्ट झालेलं नाही. दहा ते बारा टन चंदन असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्ता विरोधी पथकाने आज दुपारी पुणे- मुंबई द्रुगती मार्गावरील उर्से टोल नाका या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला पकडले. कंटेनर मध्ये मोठ्या प्रमाणावर चंदन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कंटेनर मध्ये नारळी काथ्याच्या खाली लपवून चंदनाची तस्करी केली जात असल्याच पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. दहा ते बारा टन चंदन असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या चंदनाची किंमत तब्बल २० ते २५ कोटी असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अर्पित सिंग नावाच्या व्यक्तीला आणि कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. नेमकं हे चंदन कुठे जात होतं?. ते कुणाच आहे. हे अस्पष्ट आहे. त्याचा पोलीस तपास करत आहेत.

Story img Loader