पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयातील परिसरात हत्या करण्यात केलेल्या आरोपींना पिंपरी- चिंचवड च्या गुंडा विरोधी पथकाने मोठा शिताफीने आणि पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी, पप्पू उर्फ जितेंद्र त्रिपाठी या व्यक्तीची दगडाने ठेचून तसेच नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. हत्येमुळे पिंपरी- चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, अवघ्या काही तासातच आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आल आहे.
हेही वाचा >>> भाजपचे माजी खासदार संजय काकडे दसऱ्यानंतर करणार सीमोल्लंघन, शरद पवार गटात करणार प्रवेश
औंध जिल्हा रुग्णालयाच्या पटांगणात पप्पू उर्फ जितेंद्र त्रिपाठी या व्यक्तीचा मंगळवारी मृतदेह पोलिसांना मिळाला. सांगवी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींचा शोध सुरू केला. सांगवी पोलिसांसह गुंडाविरोधी पथक देखील आरोपींचा शोध घेत होतं. गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप यांच्या टीमने काही सीसीटीव्ही तपासले. पप्पू उर्फ जितेंद्र त्रिपाठी याच्यासह आरोपी शिव मंगल सिंग आणि सोमदत्त मनमोहन दुबे हे मद्यपाणाच्या बाटल्या विकत घेत असल्याच सीसीटीव्हीत आढळले. पोलिसांनी खबऱ्यामार्फत अधिक ची माहिती काढल्यानंतर शिव मंगल सिंग हा सांगवी मध्ये कुरियर मध्ये काम करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. पोलिसांनी याबाबत कुरियर मालकाला विचारल्यानंतर शिव मंगल ची तब्येत बरी नसल्याने तो आला नसल्याचं सांगण्यात आलं. पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर शिव मंगल सिंग हा पुणे जिल्ह्याबाहेर असल्याचं आढळलं.
हेही वाचा >>> ‘बारामती’साठी शरद पवारांची नवी खेळी? इच्छुकांच्या मुलाखतीसाठी युगेंद्र पवार आलेच नाहीत
पोलिसांना आणखीनच संशय बळावला. तो आणखीन दूर जात असल्याचं लोकेशनमध्ये दिसत असल्याने शिवमंगल सिंग हा खासगी ट्रॅव्हल्स ने प्रवास करत असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. पोलिसांनी शिवमंगल आणि त्याचा साथीदार प्रवास करत असलेल्या ट्रॅव्हल्स ची माहिती काढली. ती ज्या धाब्यावर जेवण्यासाठी थांबले त्या ठिकाणाहून तपासाची चक्रे आणखी जलद केली. पोलिसांनी समृद्धी महामार्गावरून ट्रॅव्हलचा पाठलाग सुरू केला. प्रवासी जास्त असल्याने ट्रॅव्हल्स थांबवणे अवघड होतं. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ट्रॅव्हल्स चालकाला ट्रॅव्हलची गती कमी करण्यास सांगितली. अखेर काही तासांनी समृद्धी महामार्गावरील शेलू टोलनाका या ठिकाणी ट्रॅव्हल्स ला अडवून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपी हे उत्तर प्रदेश येथे पळून जाणार होते. आरोपी शिव मंगल सिंग आणि दुबे या दोघांनी हत्या करण्यात आलेला पप्पू उर्फ जितेंद्र त्रिपाठी सतत मारहाण करायचा. जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा. या त्रासाला आणि धमकीला कंटाळून दोघांनी त्रिपाठीची हत्या करायचा प्लॅन केला. यातूनच त्रिपाठीची हत्या करण्यात आली. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
© The Indian Express (P) Ltd