पिंपरी- चिंचवड : होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवडमध्ये दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. होळी आणि धुळवडीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे.

होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवडमध्ये दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. होळी आणि धुळवडीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. नागरिकांनी रस्त्यावर हुल्लडबाजी, बेदरकारपणे वाहने चालवू नयेत असे आवाहन गुन्हे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी केलं आहे.

होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दहशतमुक्त वातावरणात सण साजरा केला जाण्यावर पोलिसांचा भर आहे. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे म्हणाले. “होळी आणि धुळवड सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’साठीदेखील पथके नेमण्यात आली आहेत. दोन्ही सण उत्साहात आणि शांततेत पार पडावेत यासाठी मजबूत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुढे ते म्हणाले, सहा उपायुक्त, २०० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी, होमगार्ड असा एकूण दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. सुरक्षित आणि शांततेत सण पार पडावा. पोलिसांनी जे निर्देश दिलेत, त्यांचे नागरिकांनी पालन करावे. रस्त्यावर हुल्लडबाजी,  बेदरकारपणे वाहने चालवू नयेत,  असे आवाहन पोलीस उपायुक्तांनी केले आहे.

Story img Loader