गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून पिंपरी-चिंचवडमधील गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. दोन वर्षे करोनामुळे म्हणावा तसा प्रतिसाद गणेश मूर्तिला मिळाला नाही. यावर्षी निर्बंध नसल्याने मूर्तिकार बाप्पाची मूर्ती बनविण्यात मग्न झाले आहेत. परंतु, पेट्रोल, डिझेल दर कडाडल्याने याचा थेट फटका गणेश भक्तांना बसला आहे. कारण, गणेश मूर्तीच्या दरात तब्बल ३० ते ३५ टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. यामुळं गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

PHOTOS : वेध गणरायाच्या आगमनाचे ; यंदा गणेशोत्सव जल्लोषात

“दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. तशी तयारी देखील पाहायला मिळतेय. करोना काळात अनेकांनी साध्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा केला. जिथं ५ ते ६ फुटांची गणेश मूर्ती होती तिथं दीड – दोन फुटांच्या बसवल्या गेल्या. यावर्षी नागरिकांमध्ये उत्साह आहे, मूर्तींच बुकिंग सुरू झालं आहे.” असं कारखानदार रवींद्र चित्ते यांनी सांगितलं आहे.

मूर्ती बनवण्याचं साहित्य हे राजस्थानहून येतं –

गणेश मूर्ती बनवण्याचं साहित्य हे राजस्थान येथून येतं. साहित्याचे भाव वाढले आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीच्या खर्चात आणखी भर पडली, कामगारांचे पगार देखील वाढले आहेत. जीएसटीचा देखील फटका बसला आहे. यामुळं यावर्षी गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या दरात ३० ते ३५ टक्क्याने वाढ झाली आहे. असे कारखानदार, मूर्तिकार रवींद्र चित्ते यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितलं आहे.

गणेश मूर्तीची ऑर्डर देण्यासाठी अनेक गणेश भक्त गर्दी करत आहेत. परंतु, यावर्षी गणेश मूर्तीचे दर वाढल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसरकारने महागाई कमी करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत असे त्यांचं म्हणणं आहे. त्याचे दर स्थिर ठेवावेत अस काही नागरिकांचं म्हणणं आहे.