पिंपरी-चिंचवड: ९ मार्च रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चिंचवडमध्ये तोफ धडाडणार आहे. मनसेचा १९ वा वर्धापनदिन चिंचवडमध्ये पार पडणार आहे. या निमित्ताने राज ठाकरे हे चिंचवडमधून आपल्या मनसे सैनिकांना संबोधित करतील, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे. चिंचवडमध्ये वर्धापनदिनाची जय्यत तयारी सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवडमधील मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन पार पडणार आहे. चिंचवडमधील रामकृष्ण प्रेक्षकगृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. शहरात ठिकठिकाणी राज ठाकरे यांच्या स्वागताचे आणि वर्धापनदिनाचे स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने मनसे सैनिक येणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार आहे? महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर काय बोलतील याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे आजही उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाकरे अजित पवारांवर काही बोलणार का? हेदेखील पाहावं लागेल.