पिंपरी- चिंचवड: इन्शुरन्स कंपनी मधून बोलत असल्याचं सांगून मोठी रक्कम मिळवून देण्याच्या बहाण्याने निवृत्त सरकारी महिला कर्मचाऱ्याला २ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. लक्ष्मणकुमार पुनारामजी प्रजापती ला पुणे शहरातून तर भूपेंदर जीवनसिंग जिना आणि लक्ष्मण सिंग या दोघांना दिल्लीमधून अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी निवृत्त सरकारी महिला बँक कर्मचारीला इन्शुरन्स कंपनी मधून बोलत असल्याचं भासवले. पॉलिसी काढून त्याचा जास्त परतावा (रक्कम) मिळेल अस अमिश दाखवलं. त्यासाठी तुम्हाला जीएसटी, इन्कम टॅक्स, टीडीएस, असे वेगवेगळे चार्जेस लागतील ती रक्कम परत मिळेल अस ही सांगितलं. त्यानंतर एनपीआय, आयआरडीए, दिल्ली फायनान्स मिनिस्ट्री मधून बोलत असून त्यांचे पेंडीग पैसे काढून देतो अशी वेगवेगळी कारणे सांगून आणि विश्वास संपादन करून फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यात आणि रोख रक्कम अशी एकुण दोन कोटी तीस लाख आठ हजारांची फसवणूक केली.
निवृत्त सरकारी बँक कर्मचारी असलेल्या महिलेने तात्काळ पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांशी संपर्क साधला. तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या टीम केला. तपासादरम्यान दोन कोटी पैकी एक कोटी ६१ लाख रुपये हे पुण्यातील लक्ष्मणकुमार प्रजापती कडे दिल्याच उघड झाल. त्याला सायबर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. इतर दोन जण दिल्लीत असल्याचं देखील उघड झाल. सायबर पोलिसांची दोन टीम दिल्लीकडे रवाना केल्या. प्रजापतिकडून दहा लाख रुपये आणि पैसे मोजण्याची एक मशीन जप्त करण्यात आली. दिल्लीतील पंधरा दिवसांच्या तापसानंतर फरिदाबाद येथून भूपेंदर जीवनसिंग जिना आणि लक्ष्मण सिंग ला ताब्यात घेण्यात आल. या गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचं त्यांनी कबुल केलं आहे. त्यांच्याकडे एन.सि.पी.आय अधिकाऱ्याचे बनावट आय कार्ड मिळालं आहे. दिल्लीतील दोघांनी भारतातील अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. या मागे मोठी टोळी असण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे.