पिंपरी- चिंचवड: अत्यंत वाईट परिस्थितीत सुद्धा निष्ठावंत, सच्चे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिले आहेत. त्यामुळे चिंचवडमध्येही सच्चा शिवसैनिक स्वतःहून पुढे येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. चिंचवडमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने विजयी होतील असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज कलाटे यांच्या वाकड गावातील जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. दरम्यान त्यांनी येथील स्थानिक नागरीकांशी व माध्यमांच्या प्रतिनिधिंशी संवाद साधताना ते बोलत होते.

हेही वाचा : Sanjay Raut: २३ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय? संजय राऊत म्हणाले…

यावेळी संजय राऊत म्हणाले, कालच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत कॅम्पेन झाले. यामध्ये लाखभर खुर्च्या ठेवल्या होत्या मात्र या कॅम्पेनसाठी पाच हजारही नागरिक उपस्थित नव्हते. त्यामुळे २३ तारखेनंतर खरे चित्र सर्वांसमोर असेल. मुख्यमंत्रीपदी आता जरी एकनाथ शिंदे असले तरी २३ तारखेनंतर शिंदे यांचे भविष्य अंधकारमय असेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून १६० ते १६५ जागा आम्हाला या निवडणुकीत मिळतील, असे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच असेल. महाराष्ट्रात होत असलेल्या शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या सभेला मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहता जनतेने सत्ता बदल करण्यासाठी ही निवडणूक हाती घेतलेली आहे असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा : पिंपरी : भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे; जयंत पाटील यांचे विधान

१७ तारखेला शिवतीर्थावर सांगता सभा होणारच!

येत्या १७ तारखेला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रभरातून शिवसैनिक या स्मृतीथळाला वंदन करण्यासाठी येत असतात. जर प्रशासनाला या सभेसाठी परवानगी द्यायची नसेल तर येणाऱ्या शिवसैनिकाला अडवलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने ठरवावं काय करायचं ते. मात्र १७ तारखेला शिवतीर्थावरती सांगता सभा होणारच.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad sanjay raut rally 17 november shivtirth sabha kjp 91 css