पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये पिंपरी विधानसभेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पिंपरी विधानसभेवर दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी पिंपरीचा आमदार हा शिवसेनेचाच असणार असा चंग बांधला असून पिंपरी विधानसभेवर दावा केला आहे. सचिन भोसले हे स्वतः पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पिंपरी विधानसभेवर महाविकास आघाडीत धुसफूस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद आहे. आम्ही तिन्ही विधानसभेवर दावा करू शकतो. मात्र, पक्षश्रेष्ठी यावर निर्णय घेतील. पिंपरी विधानसभेवर आमचाच आमदार निवडून येईल असा विश्वास देखील भोसले यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेची बैठक पार पडल्यानंतर सचिन भोसले हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सचिन भोसले म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या सूचनेनुसार बैठक घेण्यात आली. कुठल्या जागा लढवायच्या याविषयी चर्चा झाली. पिंपरी, चिंचवड की भोसरी विधानसभेवर विचार करण्यात आला. ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे. ती जागा पक्षासाठी घ्यावी. ही मागणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच म्हणणं पक्षश्रेष्ठीकडे मांडणार आहे. पुढे ते म्हणाले, तिन्ही विधानसभेवर आम्ही दावा करू शकतो. शेवटी कोण कुठं लढणार हे पक्षश्रेष्ठी ठरवणार आहे.

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray says Obstruction of projects so people will not support him
“उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांची अडवणूक, जनता त्यांना थारा देणार नाही…” देवेंद्र फडणवीसांची टीका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
Sanjay Raut slams Raj Thackeray (2)
Sanjay Raut on Raj Thackeray: ‘ते ठाकरे असतील तर मी राऊत’, राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
Challenge of Sharad Pawar group before Tanaji Sawant print
लक्षवेधी लढत: परांडा : तानाजी सावंतांसमोर शरद पवार गटाचे आव्हान
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
sharad pawar nagpur, Sharad Pawar visits Nagpur,
पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते
shetkari kamgar paksha campaign for Maharashtra Assembly Election 2024
पवार, ठाकरे नेमके कुणाचे? फूट पडूनही शेकापकडून प्रचार पत्रकांमध्ये नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर

हेही वाचा…रेल्वे वाचविणार वर्षाला ५२ लाख रुपये! विजेच्या खर्चात बचत करण्यासाठी ‘अपारंपरिक’ पर्याय

आमची तिन्ही ठिकाणी ताकद आहे. पुढे ते म्हणाले, पिंपरी विधानसभेत शिवसेनेचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. ताकदीने काम करतात. तिथं शिवसैनिक आमदार होऊन गेले आहेत. ती आमच्या हक्काची जागा आहे. ती आपल्याकडे घ्यावी अशी आमची मागणी आहे. पुढे ते म्हणाले, पिंपरी विधानसभा लढवण्यास मी तीव्र इच्छुक आहे. आगामी काळात शिवसेनेचा आमदार या पिंपरी विधानसभेत दिसेल. पुढे ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत सर्व शिवसैनिक तळागाळात पोहचले. महाविकास आघाडीचे इतर नेते, पदाधिकारी हे किती काम करत होते याची माहिती आमच्या शिवसैनिकांकडे आहे. ती माहिती पक्ष प्रमुख यांच्याकडे पोहचवणार आहोत. सर्वात पुढे जाऊन आमच्या शिवसैनिकांनी काम केलं. असा उल्लेख ही सचिन भोसले यांनी केला आहे.