पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये पिंपरी विधानसभेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पिंपरी विधानसभेवर दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी पिंपरीचा आमदार हा शिवसेनेचाच असणार असा चंग बांधला असून पिंपरी विधानसभेवर दावा केला आहे. सचिन भोसले हे स्वतः पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पिंपरी विधानसभेवर महाविकास आघाडीत धुसफूस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद आहे. आम्ही तिन्ही विधानसभेवर दावा करू शकतो. मात्र, पक्षश्रेष्ठी यावर निर्णय घेतील. पिंपरी विधानसभेवर आमचाच आमदार निवडून येईल असा विश्वास देखील भोसले यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेची बैठक पार पडल्यानंतर सचिन भोसले हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा