पिंपरी : ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर पर्यावरण पूरक मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये दगडूशेठ , सिंहासन, फेटा , मुकूट, अंभूजा या गणेशमूर्ती उपलब्ध असतील. पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना यांच्या सहकार्याने हे अभियान राबविण्यात येत आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना उपनेते इरफान सय्यद यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील गणेशभक्तांना शाडूच्या, मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव काळानुरूप बदलत आहे. मात्र आज साजरा होणारा गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानीकारक तर ठरत नाहीत ना, याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल, असे सय्यद म्हणाले. शाडूच्या मूर्तीसाठी दत्तात्रय भालेराव ८६२४८६६६३३, अरुण जोगदंड ९२८४०४९०७७ आणि सुनील पवार ९४२१६६६९०० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.