आगामी महानगरपालिका मध्ये पिंपरी- चिंचवड स्वबळावर लढणार
पिंपरी- चिंचवड: आगामी पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचं विधान उद्धव ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी केल आहे. संजोग वाघेरे हे पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. यावर बोलताना त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिल आहे. संजोग वाघेरे हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजोग वाघेरे म्हणाले, चर्चेत कुठलही तथ्य नाही. अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्ष झाल्याने शुभेच्छा देण्यासाठी मी भक्ती- शक्ती या शिल्पा जवळ गेलो, त्यांना शुभेच्छा दिल्या. ते माझे मित्र आहेत. शहरात एवढं मोठं पद पहिल्यांदाच मिळालं. पद मिळाल्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करायला गेलो होतो. या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही.
पुढे ते म्हणाले, आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलेल आहे की आपण स्वबळावरती लढूया. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये शिवसेनेची वेगळी ताकद आहे. त्या विचाराचे मतदार आहेत. पुढे ते म्हणाले, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आगामी महानगरपालिकेला सामोरे जाणार आहोत. याबाबत आमची बैठक देखील झालेली आहे.