पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कलाटे यांची ताकद वाढली आहे. चिंचवडमध्ये भाजपला कलाटे हेच रोखू शकतात. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणीने एकमताने कलाटे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळीही वंचित बहुजन आघाडीने राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता. चिंचवड मतदारसंघात वंचितची बऱ्यापैकी ताकद आहे. पोटनिवडणुकीत कलाटे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे या दोघांनीही वंचितकडे पाठिंब्याची मागणी केली होती. त्यामुळे वंचित कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेरीस वंचितने कलाटे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.

maharashtra assembly election 2024 Congress High Command started efforts for the return of the rebels in gondia
‘हायकमांड’चा आदेश अन् गोंदियातील काही बंडखोर नरमले, तर काही ठाम
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
gadchiroli vidhan sabha election 2024
गडचिरोलीत आत्राम, गेडाम, मडावी बंडखोरीवर ठाम, होळी, कोवासे, कोवे माघार घेण्याची शक्यता?
Jayant Patil On Ajit Pawar
Jayant Patil : ‘सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना १० वर्षे ब्लॅकमेल केलं’; त्यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा का होती? जयंत पाटलांचा मोठा दावा
maharashtra assemly election 2024 Rebellion challenge of Dr Devrao Holi and Ambrishrao Atram for BJP in aheri and gadchiroli Constituency
भाजपपुढे होळी, आत्रामांच्या बंडखोरीचे आव्हान, फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष….
bjp vs ncp sharad pawar
सोलापुरात बालेकिल्ला राखण्यासाठी भाजप राष्ट्रवादीत चुरस
Maharashtra assembly election
बंडखोर लढण्यावर ठाम, नेत्यांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न; जागावाटपाच्या घोळामुळे बंडाळी अटळ
Buldhana rebels Mahayuti, Mahavikas Aghadi rebels Buldhana, Sindkhed Raja, Buldhana, Mahayuti Buldhana , Mahavikas Aghadi Buldhana,
सिंदखेड राजा, बुलढाण्याचा तिढा मुंबईतच सुटण्याची चिन्हे, अपक्षांचीही मनधरणी

नक्की पाहा – Rohit Pawar on Rahul Kalate: ‘कलाटेंचे चिन्ह शिट्टी ही..’; रोहित पवारांचा कलाटेंना टोला

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की पहाटेच्या शपथविधीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात गौप्यस्फोट केला. त्यामध्ये सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशीर्वाद होता असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीने भाजपबरोबर जाणार नाही असा कुठेही खुलासा केलेला नाही. गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती बदललेली आहे.

आणखी वाचा – चिंचवडमधील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे सर्वांत श्रीमंत! ‘इतकी’ आहे मालमत्ता

चिंचवडमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता. त्यांनी एक लाख १२ हजार मते घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते होते. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. परंतु, तसे घडले नाही. चिंचवडमध्ये कलाटे हेच भाजपला थांबवू शकतात या मताला आम्ही आलो आहोत. राज्य कार्यकारिणीने एकमताने राहुल कलाटे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीने भाजपबरोबर जाणार नाही असे स्पष्टपणे म्हटलेले नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती बदललेली आहे.

–  रेखा ठाकूर, वंचित बहुजन आघाडी