पिंपरी- चिंचवड: अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हे अवघ्या महाराष्ट्राचं स्वप्न आहे. ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केल आहे. आमदार अण्णा बनसोडे हे पिंपरी- चिंचवड मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमदार अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते पिंपरी- चिंचवड मध्ये दाखल झाले. मुंबई ते पिंपरी- चिंचवड दरम्यान त्यांचं जागोजागी फटाक्याची आतषबाजी आणि फुलांच्या हाराने सत्कार करून स्वागत करण्यात आल आहे. अण्णा बनसोडे म्हणाले, अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून एकदातरी पाहायचं आहे. ते मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे. ते लवकरच मुख्यमंत्री होतील. असा विश्वास अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

पुढे ते म्हणाले, माझं स्वप्न होतं. मी नगरसेवक व्हावं, स्थायी समितीच अध्यक्ष व्हावं, आमदार व्हावं. पुढे ते म्हणाले, मंत्री पद मिळेल असा मला विश्वास होता. कुठलं ना कुठलं पद मिळेल. अखेर हे पद अजित पवारांनी मला दिलं आहे. पुढे ते म्हणाले, मागासवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला अजित पवारांनी विधानसभा उपाध्यक्ष केलं आहे. अजित पवारांच्या चांगल्या आणि वाईट काळात सोबत राहिलेलो आहे. हे प्रामाणिक पणाच फळ मिळालं आहे. पुढे ते म्हणाले, महायुती म्हणून आम्ही काम करत आहोत. तिन्ही पक्षाचे जेष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आगामी महानगर पालिकेसाठी मान्य असेल. अस ही अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे.