पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची समस्या अद्याप दूर झालेली नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, आज शेकडो महिलांनी महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर हंडा मोर्चा काढला. मोर्चातील ‘आवाजा’ने खडबडून जागे झालेल्या आयुक्तांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पावसाला सुरुवात झाली आहे. पण पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या अद्याप दूर झालेली नाही. २ मेपासून शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. मात्र, काही भागांत पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील लालटोपी नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गेल्या काही दिवसांपासून भेडसावत आहे. मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आज शेकडो महिलांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बंगल्यावर हंडा मोर्चा काढला. महिला हंडा, बादल्या घेऊन बंगल्यावर पोहोचल्या आणि त्यांनी आयुक्तांना पाण्याच्या समस्येची जाणीव करून दिली. त्याची दखल घेत हर्डीकर यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी तात्काळ पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला असून, पिण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लावला. टँकर मिळाल्यानंतर महिलांनीही आपला मोर्चा घराकडे वळवला. टँकरद्वारे पाणीपुरवठा करून एका दिवसाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी भविष्यात महिलांवर हंडा मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही, यासाठी महापालिका प्रशासन काय खबरदारी घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.