पिंपरी-चिंचवडमध्ये रुममध्ये डोकावून का पाहिले? याचा जाब विचारल्यामुळे महिलेवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी गणेश शांताराम जावळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंग लखनलाल श्रीवास यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
हेही वाचा – केळ्यांसाठी शाळांना मिळणार अनुदान… काय करावे लागणार?
u
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आठच्या सुमारास आरोपी गणेश शांताराम जावळे हा तक्रारदार यांच्या रूममध्ये डोकावून पाहत होता. तक्रारदार यांची पत्नी घरी होती. आमच्या रूममध्ये डोकावून का पाहत आहात? असं म्हणत चापट मारली. याच रागातून तक्रारदार यांच्या पत्नीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याच घरातील किचन ओट्यावर असलेल्या स्क्रू ड्रायव्हरने महिलेच्या गळ्यावर, गालावर, हात आणि पायावर ठिकठिकाणी वार करण्यात आले. जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अखेर याप्रकरणी जयसिंग यांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गणेश जावळे याला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.