पिंपरी- चिंचवड परिसरातून महिलेचे स्कार्पियो मधून अपहरण करण्यात आल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता. हा प्रकार घरगुती वादातून घडल्याचा पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पती-पत्नीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीच्या काळभोर नगर परिसरातून तीन जणांनी महिलेच स्कार्पियो मधून अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला होता. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तात्काळ तपास करत अवघ्या काही तासातच या प्रकरणाचे सत्य समोर आणले आहे. हा सर्व प्रकार अपहरणाचा नसून पती- पत्नीच्या वादातून घडल्याचं समोर आलं आहे.

मुंबईवरून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पती- पत्नीचे काळभोर नगर परिसरात येताच वाद झाले. पत्नीने स्कार्पियोमधून उतरून रागात पुढे चालायला लागली. महिलेला स्कार्पिओ मधील सर्वजण विनवणी करत होते. मात्र महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. रात्रीची वेळ असल्याने महिलेला बळजबरीने उचलून स्कार्पिओ मध्ये बसवले. स्कार्पिओ मध्ये महिलेचा मुलगा देखील होता. हे कुटुंब पुण्याच्या दिशेने जात होते. या घटनेमुळे मात्र पिंपरी- चिंचवड पोलिसांची धावपळ झाली आहे. पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, पिंपरी पोलिसांनी तपास केला.

नेमकं काय घडलं होतं?

मुंबईच्या दिशेवरून पुण्याच्या दिशेने जाणारं कुटुंब सोमाटणे फाटा येथील टोलनाक्यावर जेवणासाठी थांबले. तिथेच पती- पत्नीमध्ये वाद झाले. पुन्हा, पिंपरीत पत्नी रागाच्या भरात स्कार्पियो मधून खाली उतरली. महिलेचा दुसरा विवाह असून त्यांना एक मुलगा देखील आहे. हा सर्व प्रकार अपहरणाचा नसल्याचा समोर आला आहे.