पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या पोलीस शिपाई पदाच्या २६२ रिक्त जागांकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. लेखी परीक्षेकरिता पात्र असलेल्या २,९८९ उमेदवारांची आज लेखी परीक्षा श्री बालाजी युनिव्हर्सिटी ताथवडे येथे होत आहे. रात्रीच अनेक उमेदवार वाकड परिसरात मुक्कामी आले होते. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्यांची राहण्याची उत्तम सोय केली. आज सकाळी परिक्षेपूर्वी चहा-नाश्टा देण्यात आला. युवक आणि तरुणींचा यात मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. शेकडो परीक्षार्थी हे बाहेरगावावरून आले होते. त्यांच्या राहण्याची सोय केल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा – पुणे : वणव्यानंतर पुन्हा फुलणाऱ्या नव्या वनस्पतीचा तळेगाव दाभाडेनजीक शोध
हेही वाचा – भावी डॉक्टरांच्या आत्महत्या वाढल्या! सरकारनं त्या रोखण्यासाठी उचललं मोठं पाऊल
लेखी परिक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त
लेखी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. चार पोलीस उप- आयुक्त, चार सहाय्यक पोलीस आयुक्त, ३१ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, १३३ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. तर अंमलदार ४४४ आणि वॉर्डन २० असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेकदा परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलीस सज्ज आहेत.