पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेकडून चिखली- कुदळवाडीत अतिक्रमण कारवाई सुरू आहे. दुकाने, कंपनी, घरे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. आपल्या डोळ्या देखत राहतं घर पाडल्याने एक तरुण ढसाढसा रडला. त्या तरुणाची फसवणूक करण्यात आली. राहतं घर हे अनधिकृत असल्याचं माहीती नव्हती अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. कुटुंबाची राहण्याची सोय करावी अशी मागणी त्याने प्रशासनाकडे केली आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडीत अनधिकृत भंगार गोदाम, दुकाने, घरे, कंपनीवर हातोडा सुरू आहे. जवळपास या परिसरात चार हजार हुन अधिक अनधिकृत बांधकाम आणि पत्राशेड उभारणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, आज पहाटे पासून परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा घेऊन महानगर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. दरम्यान, आपलं राहतं घर पालिकेकडून पाडण्यात आल्यानंतर तरुणाला रडू कोसळलं. ढसाढसा रडायला लागला.

आम्ही शुन्य झालो आहोत. आमची रोजी रोटी बंद झाली. अस म्हणत तरुण हुंदका देऊन रडत होता. सरकार ने आमच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था करावी. एक- एक रुपया जमा करून घर उभा केल. पण, अनधिकृत घर असल्याने त्यावर आज हातोडा पडला. अशी प्रतिक्रिया तरुणाने दिली आहे.

Story img Loader