पिंपरी-चिंचवड शहराला रेड झोन मधून वगळण्यात आल्यानंतर शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शहरातील विविध दुकानांना अटी आणि शर्तीसह खुली करण्याची परवानगी महानगर पालिका प्रशासनाने दिलेली आहे. दरम्यान, अनेक भागात आवडीचे पदार्थांचे हातगाडी आणि स्टॉल सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. वडापाव हा सर्वांच्याच आवडीचा असून त्याचे स्टॉल देखील सुरू झाले आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वडापावच्या स्टॉलवर ग्राहकांना सॅनिटायझर दिलं जात असून सुरक्षित अंतर ठेवलं जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात वडापाव प्रेमींसाठी खास बातमी आहे. शहरातील बहुतांश भागातील वडापावची दुकान, स्टॉल सुरू झाले असून त्या ठिकाणी गर्दी दिसत आहे. दरम्यान, दुकान मालकांमध्ये महानगर पालिकेच्या परवानगी बाबत संभ्रम आहे. राज्य आणि केंद्र सरकार ने हॉटेल चालकांना परवानगी देण्यात आल्याने आमचा कुठेच उल्लेख नाही, त्यात अडीच महिण्यापासून व्यवसाय बंद आहे. भाडे कोठून भरायचे असे अनेक प्रश्न असल्याने वडापाव चा स्टॉल सुरू केला असल्याचे मालक किरण जाधव यांनी सांगितले आहे.

वडापाव प्रेमी यांनी देखील खबरदारी म्हणून सोशल डिस्टसिंग आणि इतर खबरदारी वडापाव विक्रेत्यांनी घ्यावी अस सुचवलं आहे. अडीच महिण्यापासून घरात आहोत घरात वडापाव खाल्ला पण बाहेरच्या सारखी वडापाव ला चव येत नसल्याने वडापाव खात आहोत अशा प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत. अडीच महिन्याच्या कालावधीनंतर वडापाव प्रेमींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत आहे.

Story img Loader