पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील साडेचार हजार पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची दिवाळी गोड झालेली आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस कल्याण निधी अंतर्गत प्रत्येकी पोलीस अमलदार आणि अधिकाऱ्यांना पाच किलो साखरेचे वाटप केले आहे. यामुळे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकारी यांची दिवाळी गोड झाल्याचं बोललं जात आहे.
पोलीस म्हटलं की २४ तास ऑन ड्युटी राहावं लागतं. पोलिसांमुळेच सर्वसामान्य नागरिकांचे सण सुरक्षित रित्या पार पडतात. त्याच पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना दिवाळी सारखे महत्त्वाचे सण साजरा करता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी खाकी वर्दी च पोलिसांची भावना समजू शकतो. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस आयुक्तालयातील साडेचार हजार पोलिसांची पोलीस कल्याण निधीमधून पाच किलो साखरेच वाटप केले आहे. पोलीस आयुक्तांच कौतुक होताना दिसत आहे. याआधी असा उपक्रम राबविण्यात आलेला नव्हता. असाही उपक्रम राबवून पोलिसांच मनोबल वाढवू शकतो असा संदेश पोलीस आयुक्तांनी दिला आहे असं म्हणावं लागेल.