जमावबंदी आदेश झुगारून मोर्चा काढणाऱ्या तसेच सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या आंदोलक व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी पालिकेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसनेते कैलास कदम यांनी केली आहे.
काँग्रेसने मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी एलबीटीचे जोरदार समर्थन केल्यानंतर उशिरा का होईना मौन सोडले आहे. विरोधी पक्षनेते कदम यांनी यासंदर्भात निवेदन प्रसिध्दीस दिले असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत करणाऱ्या आडमुठय़ा व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर ‘इस्मा’ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काही कर चुकवणारे व हेकेखोर व्यापारी नागरिकांची तसेच किरकोळ व्यापाऱ्यांची दिशाभूल करत आहेत. बहुतांश व्यापारी दुकाने उघडण्यास उत्सुक असताना त्यांना दबाव आणून बंदमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले जात आहे. हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार बुडतो आहे. झोपडपट्टीतील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा