जकातीच्या भरघोस उत्पन्नामुळे श्रीमंत महापालिका ठरलेल्या पिंपरी महापालिकेला एलबीटीपासून (स्थानिक संस्था कर) अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे चालू आर्थिक वर्षांतील चौथ्या महिन्यात पुन्हा दिसून आले आहे. जुलै महिन्यात एलबीटीतून ७८ कोटी ३८ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. जकातीच्या तुलनेत कोटय़वधी रुपयांची तफावत कायम आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार एक एप्रिलपासून एलबीटी लागू करण्यात आली. पिंपरीत जकातीतून मिळणारे उत्पन्न व एलबीटीचे उत्पन्न यामध्ये कमालीची तफावत दिसून येत आहे. एलबीटी लागू झाल्यानंतर एप्रिल महिन्यात ५२ कोटी, मेमध्ये ७६ कोटी, जूनमध्ये ६५ कोटी आणि जुलै महिन्यात ७८ कोटी असे एलबीटीचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे जकातीच्या तुलनेत कोटय़वधींचा फटका बसत असल्याचे तीन महिन्यात दिसून आले होते. चौथ्या महिन्यातही तेच चित्र कायम आहे. जकात असताना जुलै महिन्यात ९२ कोटी उत्पन्न होते. तेच एलबीटी लागू झाल्यानंतर जुलैचे उत्पन्न ७८ कोटी मिळाले आहे.
पिंपरीत चौथ्या महिन्यातही एलबीटीमुळे कोटय़वधींचा फटका
जकातीच्या भरघोस उत्पन्नामुळे श्रीमंत महापालिका ठरलेल्या पिंपरी महापालिकेला एलबीटीपासून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे चालू आर्थिक वर्षांतील चौथ्या महिन्यात पुन्हा दिसून आले आहे.
First published on: 23-08-2013 at 02:36 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri corp suffers loss of cr rs due to lbt