राष्ट्रवादी काँग्रेस हा दरोडेखोरांचा पक्ष असून िपपरी पालिका म्हणजे राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे आगार बनले आहे, अशी टीका भाजपचे खासदार अमर साबळे यांनी केली आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजप-रिपाइंचे उमेदवार गणेश लंगोटे यांच्या प्रचाराचा प्रारंभ खासदार साबळे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर, ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
साबळे म्हणाले, चिंचवडची पोटनिवडणूक ‘लक्ष्य २०१७’ च्या दृष्टीने चाचणी परीक्षा आहे. केंद्रात व राज्यात परिवर्तन झाले, तसेच पोटनिवडणुकीत होणार आहे. राष्ट्रवादीची गुन्हेगारी, पालिकेतील भ्रष्टाचार, बनावट जातीचे दाखले, विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट आदी मुद्दय़ांवर प्रचारात भर राहणार आहे. लंगोटे चारित्र्यसंपन्न उमेदवार असून निवडून येण्याची क्षमता असल्याने उमेदवारी दिली आहे. आयात उमेदवारांवर भाजप अवलंबून नाही, आमचाकडेही सक्षम उमेदवार आहेत.
शहराध्यक्ष खाडे म्हणाले, लढाई राष्ट्रवादीशीच असून भाजपचा झेंडा फडकणार आहे. लंगोटे म्हणाले, २२ वर्षांपासून कार्यरत असून कामांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क आहे, त्या जोरावर निवडून येऊ, असा विश्वास आहे.

Story img Loader