पिंपरी : वाढत्या लोकसंख्येला पाण्याची उपलब्धता होत नसल्याने मागील साडेचार वर्षांपासून शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत असताना कोणतीही पाणी गळती आणि पाणी चोरी होत नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत आमदार अश्विनी जगताप यांनी प्रश्न विचारला होता. प्रत्यक्षात किती टँकरव्दारे पाणीपुरवठा केला, याचा हिशेब जुळत नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. ४० टक्के पाणीगळती व पाण्याची चोरी होत असताना देखील अनधिकृतपणे पाणी विक्री करणाऱ्या आणि टँकर लॉबीच्या फायद्यासाठी संबंधित अधिकारी व दलालांच्या संगनमताने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून नागरिकांना पाणी विकले जात असल्याचा आरोप आमदार जगताप यांनी केला. खासगी आणि महापालिकेच्या टँकरच्या पाण्याचे ऑडिट करण्यात आले आहे का, अशी विचारणा त्यांनी केली.

Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Chandrapur city Rain of Rs 200 notes morning aam aadmi party BJP election campaign
आश्चर्य! चंद्रपूर शहरात पहाटे चक्क २०० रूपयांच्या नोटांचा पाऊस…
if want vote then Save rivers trees and hills
मत हवं? नद्या, झाडे, टेकड्या वाचवा…
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका

हेही वाचा – पुणे : लष्कर न्यायालयात मिळणार आता लवकर ‘न्याय’… घेतला ‘हा’ निर्णय

हेही वाचा – अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश?

या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शहरातील उच्चभ्रू वसाहती, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, उद्योगधंदे व झोपडपट्टीतील नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे २०२३-२४ मध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला. सहा हजार १६० खेपा टँकरच्या झाल्या आहेत. शहरात पाणी गळती व चोरी होत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.