पिंपरी शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदी पात्रामध्ये राडारोडा आणि मातीचा भराव टाकण्याचे प्रकार शहरात सर्रासपणे सुरू आहेत. त्यामुळे नदी पात्र अरूंद होत आहेत. राडारोडा टाकणारी सहा ट्रक व टेम्पो महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने जप्त केले. त्यांच्याकडून ६५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरातून वाहणार्‍या तीनही नदी पात्रात राडारोडा व मातीचा भराव टाकून सपाटीकरण केले जाते. तेथे अनधिकृत बांधकाम किंवा पत्राशेड बांधून ते भांड्याने देणे किंवा विकले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र, या प्रकाराकडे महापालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नदीकाठी राडारोडा टाकण्याचे प्रकार सर्वत्र वाढले आहेत.

Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Garbage piles up in various places in the city due to the recruitment of election workers Mumbai news
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; निवडणूक कामातील कामगारांच्या नियुक्त्यांमुळे कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
Unauthorized parking lots, dhabas, Dronagiri,
उरण : द्रोणागिरी, पुष्पकनगरमध्ये अनधिकृत वाहनतळ, ढाबे

हेही वाचा…बारामती, पिंपरी-चिंचवडमधील कुणबी नोंदीचे गूढ

तक्रार केल्यानंतर महापालिकेचा क्षेत्रीय कार्यालय तसेच, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग जागे झाल्याचे ढोंग करीत कारवाई करते. कारवाईनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती सुरू होते.या लोकांवर कायमस्वरूपी कारवाई करून त्यांना निर्बंध लादण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

पिंपळे गुरव येथील मोरया पार्क, कृष्णराज कॉलनी, अमृता कॉलनी, भाऊ नगर, मुक्तांगण लॉन्स, देवकर पार्क, शिवनेरी कॉलनी या भागांतून दररोज ट्रक, ट्रक्टर, डम्पर, टेम्पोतून राडारोडा नदी काठी टाकला जात आहे. त्या बाबतची तक्रार पर्यावरण विभागास प्राप्त झाली. त्यानंतर पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून त्या वाहनचालकांवर कारवाई केली.

हेही वाचा…पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद, कारण…

नदी पात्रात भराव टाकणारे नितीन दर्शिले यांच्या मालकीचे चार वाहने जप्त करण्यात आली आहेत. दामोदर तळीमट्टी यांचा ट्रॅक्टर, नागनाथ मंजुळे यांचा एक टेम्पो, लकाप्पा पुजारी यांचा एक टेम्पो अशी सात वाहने महापालिकेने जप्त केली आहेत. या वाहनमालकांकडून एकूण ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, मल्टिपर्पज वर्कर गोरक्षनाथ करपे यांनी ही कारवाई केली. त्यासाठी पर्यावरण पथक, एमएसएफच्या जवानांची मदत घेण्यात आली..