पिंपरी : कोयत्याचा धाक दाखवत एका सराफी व्यावसायिकाकडे दरमहा पाच हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्याला चाकण पोलिसांनी अटक केली. अरफाज वाजिद ऊर्फ लाला सिकिलकर (रा. चाकण ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सराफी व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफी व्यावसायिक हे त्यांच्या दुकानासमोर उभे होते. त्या वेळी अरफाज हा हातात कोयता घेऊन तिथे आला. त्याने पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी कशाचे पैसे म्हणून विचारणा केली. त्या वेळी अरफाजने सराफी पेढी चालवायची असेल तर दरमहा पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक पळून गेले. दरमहा पाच हजार रुपये हप्ता न दिल्यास कोयत्याने तोडतो, अशी धमकीही त्याने दिली.

कोयता बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक

कोयता बाळगल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी राहुल श्रीकृष्ण काटे (वय २७, रा. अजंठानगर, चिंचवड) याला अटक केली आहे. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार दीपक पिसे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Story img Loader