पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात असलेल्या काशीद पार्कजवळील एका बिगारी कामगाराच्या घराला गुरुवारी भीषण आग लागली. या आगीत या कामगारांचे अंदाजे पाच लाख रुपये जळून खाक झाले आहेत. घराला आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही.
अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्र आणि रहाटणी अग्निशमन केंद्रातून चार अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले यांनी दिली.
हेही वाचा – दूषित पाणी अथवा अन्नामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोम! काळजी काय घ्यावी जाणून घ्या…
हेही वाचा – पुणे : शिवजयंती महोत्सवासाठी या सुविधा द्या, शिवभक्तांची महापालिकेकडे मागणी !
दाट लोकवस्तीमुळे अग्निशमन बंबाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. आग २० मिनिटांत आटोक्यात आणण्यात आली. कामगाराने घरात ठेवलेली रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू जळल्या. २० पत्र्याची घरे या आगीत उद्ध्वस्त झाली असून, सुमारे पाच लाख रुपये रोख रक्कम आणि पाच तोळे सोन्याचे दागिने असे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तविला आहे.