पिंपरी : लग्न सोहळयापूर्वी वधु-वरांनी हातात धरलेले मतदान जनजागृतीचे फ्लेक्स, वधु-वर मातापित्यांनी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी मतदान करावा या आशयाचा हातात घेतलेला मतदानाचा फलक, स्वीप नोडल अधिकाऱ्यांनी केले मतदानाच्या शपथेचे वाचन आणि मंचावर तसेच लॉनवर उपस्थित नातेवाईक व तीन हजारांहून अधिक पाहुण्यांनी घेतली मतदानाची शपथ असा अनोखा मतदान जनजागृतीचा सोहळा पिंपरी-चिंचवड शहरात संपन्न झाला.

विवाह हा जीवनातील महत्त्वाचा प्रसंग असतो. सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा हा प्रसंग सर्वांच्याच कायम संस्मरणात रहावा त्यातून समाजप्रबोधनही व्हावे, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले जावे या सामाजिक बांधिलकीतून या अनोख्या मतदान जनजागृतीचे आयोजन मंगल परिणय सोहळ्यात करण्यात आले होते. रहाटणी येथील गौरी कांबळे व चिंचवड येथील मनोज जगताप या वधुवरांच्या मंगल परिणयानिमित्त आयोजित सोहळ्यात पिंपरी विधानसभा कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास बहुजन बहुउद्देशीय विकास संस्थेचे सहकार्य लाभले.

justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
sharad pawar elected guest president for 98 akhil bharatiya marathi sahitya sammelan
शरद पवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष… हे पद किती महत्त्वाचे?
Waqf Amendment Bill to be tabled in February 2025 budget session
‘वक्फ’मध्ये महत्त्वाचे बदल नाहीच? मूळ विधेयक लोकसभेत संमत होण्याची शक्यता
Maharashtra New CM Devendra Fadnavis Swearing Ceremony Live Updates
Maharashtra CM Oath Ceremony : मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच देवेंद्र फडणवीसांकडून लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती, म्हणाले…
Guy went to marry for the second time without getting divorced first wife creates ruckus in marriage hall video goes viral
नवऱ्याचं लफडं बायकोनं पकडलं! दुसरं लग्न करताना अचानक समोर आली अन्; खतरनाक VIDEO व्हायरल
Ajit Pawar on Delhi Tour
Ajit Pawar: ‘अचानक दिल्ली दौरा का केला?’ अमित शाहांच्या कथित भेटीबाबत अजित पवारांचा मोठा खुलासा

हेही वाचा – वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी

यावेळी उपस्थितांनी “आम्ही भारतीय नागरीक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु” अशी शपथ घेऊन मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाविषयी माहिती देऊन मतदान शपथेचे वाचन केले तसेच सक्षम लोकशाहीसाठी मतदारांनी निवडणूकीमध्ये मतदान करणे आवश्यक असून त्याकरिता सर्वांनी मतदान करावे असे आवाहन केले. या विवाह सोहळ्यात प्रवेशद्वारापासून सर्वत्र मतदान जनजागृतीचे फ्लेक्स लावण्यात आलेले होते. याशिवाय बहुजन बहुउद्देशीय विकास संस्थेच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली संविधानातून मतदानाचे अधिकार याबाबत जनजागृतीपर संदेश फलकही लावण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे नियोजन बहुजन बहुउद्देश्य विकास संस्थेचे पदाधिकारी प्रदीप पवार, रमेश जाधव, मिलिंद जाधव, प्रमोद गायकवाड, आशाताई बैसाणे व विजय कांबळे यांच्या वतीने करण्यात आले. या सोहळयास अरुण चाबुकस्वार, विलास कांबळे, हरीश गायकवाड, तसेच स्वीप विभागाचे महालिंग मुळे उपस्थित होते.

हेही वाचा – पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा

जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रात व्यापक प्रमाणात मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून त्यास नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या दृष्टीकोनातून विविध उपक्रमाद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. नागरीकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे व मतदानाचा हक्क बजवावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी सांगितले.

Story img Loader