पिंपरी : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार प्रकरणाची पुनरावृत्ती आळंदीजवळील वडगाव घेनंद येथे घडल्याची समोर आले आहे. मोटार वेगात चालवू नकोस असे सांगितल्याने झालेल्या वादातून १७ वर्षीय मुलाने भरधाव मोटार महिलेच्या अंगावर घातली. यात महिला जखमी झाली आहे.

याबाबत नाजुका रणजीत थोरात (वय २४, रा. गणेशनगर, वडगाव घेनंद) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला.

incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
Chembur Marwari Chawl, citizens vote vidhan sabha boycott, vote boycott, rehabilitation,
मुंबई : दीड हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
maharashtra assembly election 2024, raosaheb danve,
रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

हेही वाचा – आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी; १२ लाखांचे विदेशी मद्य जप्त

थोरात आणि अल्पवयीन मुलगा शेजारी रहायला आहेत. मुलगा मोटार वेगात चालवत होता. त्यावरून थोरात यांनी मोटार वेगात चालवू नकोस, असे सांगितले होते. त्यातून त्यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून मुलाने मोटार भरधाव वेगात चालविली. ‘थांब तुला गाडी खाली चिरडून जीवे ठार मारतो’ असे म्हणत रस्त्यावर थांबलेल्या थोरात यांच्या अंगावर भरधाव मोटार घातली. त्यात त्या जखमी झाल्या. तसेच थोरात आणि त्यांच्या पतीला ‘तुला संपवतो’ असे म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा – फळभाज्या कडाडल्या : ‘या’ भाज्यांचे किलोचे दर शंभरी पार

अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी

अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. त्यात अल्पवयीन मुलगा हा अगोदर मोटार वेगात पाठीमागे घेतो आणि त्यापेक्षा जास्त वेगाने मोटार पुढे घेत महिलेच्या अंगावर घालून पुढे निघून जात असल्याचे दिसत आहे.