पिंपरी : शहरातील गोर-गरीब कॅन्सरग्रस्त रुग्णांना अल्प दरात उपचार मिळावेत, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगावमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी पालिकेच्या वैद्यकीय विभागाचे एक पथक सुरत शहरात ‘पीपीपी’ तत्वावर सुरू असलेल्या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय सुविधा या उच्च दर्जाचा आहेत. गेल्या काही वर्षांत कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी उपचाराची महापालिकेच्या रुग्णालयात सोय उपलब्ध नाही. कॅन्सर रुग्णालय उभारण्याची अनेकांची मागणी आहे. महापालिकेच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले जात आहे, मात्र त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. आता आयुक्त शेखर सिंह यांनी यासाठी पावले उचलली आहेत. थेरगाव येथील नवीन रुग्णालयाजवळ ३४ ते ३५ गुंठे जागा आहे. या जागेत पीपीपी तत्वावर कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. यासाठी निविदेची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. निविदा झाल्यापासून दीड ते दोन वर्षांत रुग्णालय उभारण्याचा मानस वैद्यकीय विभागाचा आहे. रुग्णालय झाल्यानंतर महापालिका ठरवून देईल, त्यानुसारच दर आकारणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
Vote and get discount on hotel bill 10 percent discount on payment of voters on behalf of Pune Hotel Association
मतदान करा अन् बिलात सवलत मिळवा! पुणे हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या देयकावर १० टक्के सूट
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Excitement in political circles over Chhagan Bhujbal claim
भुजबळांच्या दाव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा

हेही वाचा – पुणे: ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत; विनय अऱ्हानासह तिघांना पोलीस कोठडी

गुजरातमधील सुरतमध्ये महापालिकेतर्फे पीपीपी तत्वावर कॅन्सर रुग्णालय चालविण्यात येत आहे. हे रुग्णालय कशाप्रकारे चालविले जाते, यासाठी महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यासह चार जणांचे पथक पुढील आठवड्यात पाहणीसाठी जाणार आहे.

हेही वाचा – पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्यातून ‘प्रकाश’, मोशीत दिवसाला होते एवढी वीजनिर्मिती

कॅन्सर रुग्णालय उभारणीसाठी निविदेची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी सुरत महापालिकेच्या कॅन्सर रुग्णालयाची पाहणी करण्यास जाणार आहोत. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी